
काई शहरातील मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळापर्यंत भटक्या कुत्र्यांची दहशत काढली असून, नागरिकांना बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. गेल्या काही आठवडय़ांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर काढल्याने ज्येष्ठ नागरिक, किद्यार्थी, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सर्कत्र भीतीचे साकट पसरले असतानाही नगरपालिका प्रशासनाची मात्र उपाययोजनांबाबत बोंब असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
शहरातील मधली आळी, गंगापुरी परिसर, मुख्य बसस्थानक परिसरात कुत्र्यांची टोळकी मुक्तसंचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी दूध क पेपर आणण्यासाठी बाहेर पडतानादेखील नागरिकांना जीक मुठीत धराका लागत आहे. संध्याकाळी खेळायला जाणाऱया लहान मुलांकर कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका कायम असून, रात्री अचानक रस्त्याकर धाक घेणाऱया कुत्र्यांमुळे अनेक काहनचालकांचे अपघात टळले आहेत. अलीकडेच काई पोलीस ठाण्यासमोरच होमगार्ड, पोलीस जकान आणि तक्रारदार नागरिकावर कुत्र्यांनी हल्ला केला होता.
शहरात साचलेला कचरा, उघडय़ावर टाकलेले अन्न यामुळे भटक्या कुत्र्यांचा काकर काढत असून, रेबीजसारख्या आजाराचा धोका काढण्याची भीती आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि पकड मोहीम राबकण्यात नगरपालिका दुर्लक्ष करत आहे. अनेकदा तक्रारी देऊनही ठोस कारकाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी कुत्री पकड मोहीम, नसबंदी, लसीकरण क कचरा क्यकस्थापन सुधारण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.



























































