“स्त्री 2” ने रचला इतिहास, “गदर 2” ला ही मागे टाकले

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत स्त्री 2 हा चित्रपट सलग दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपठ ठरला आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर नवीन उंची गाठली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत “X” वर ट्विट करत याबाबत माहिती दिली. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात एकूण 453.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आठवड्यात नवीन चित्रपट रिलीज झाले तरी त्याचा परिणाम या चित्रपटावर झालेला दिसला नाही.

अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवनचा कॅमिओ देखील आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारचा स्पेशल अपिअरंसदेखील चित्रपटात आहे.