उकळत्या सांबारात पडल्याने पहिलीतल्या मुलाचा मृत्यू

912

आंध्र प्रदेशातील कुरनूल भागात एक हादरवणारी घटना घडली आहे. पनयाम शहरातील एका शाळकरी विद्यार्थ्याचा उकळत्या सांबारात पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना विद्या निकेतन शाळेमध्ये घडली आहे.

बुधवारी दुपारी विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करण्यात येत होतं. शाळेतील महिला कर्मचाऱ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना भोजन कक्षात आणण्यासाठी सुरुवात केली. सगळे विद्यार्थी रांगेत आणण्यात येत होतं. अचानक हा विद्यार्थी रांग सोडून बाहेर पळाला. नेमकं त्याचवेळी कर्मचाऱ्यांनी उकळतं सांबार या कक्षात आणून ठेवलं. पळता पळता हा विद्यार्थी सांबाराच्या पातेल्यामध्ये पडला. उकळतं सांबार असल्याने या चिमुरड्याला काही कळायच्या आतच तो भाजला.

या विद्यार्थ्याला पातेल्यातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाने सांगितलं. या घटनेनंतर पोलिसांनी शाळा प्रशासनाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या