आधारकार्ड नसल्याने विद्यार्थिनीला जेईई परीक्षेला प्रवेश नाकारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधारकार्ड नसल्यामुळे आर. एन. नेत्रा या विद्यार्थिनीला जेईई परीक्षेला बसता आले नाही. ही विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी कल्याण येथील केंद्रावर गेली होती. मात्र तिच्याकडे आधारकार्डच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याने तिची महत्त्वाची परीक्षा हुकली. या घटनेमुळे विद्यार्थिनीसह तिच्या पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आर. एन. नेत्रा ही विद्यार्थिनी जेईई परीक्षा देण्यासाठी वेळेतच परीक्षा केंद्रावर पोहोचली होती. मात्र तिच्याकडे आवश्यक त्या स्वरूपात आधारकार्ड नसल्याचे कारण देत केंद्र प्रशासनाने तिला आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे तिला परीक्षेला बसता आले नाही. या प्रकारामुळे नेत्रा हिचे दोन वर्षांचे कष्ट व अभ्यास वाया गेले आहे. तिच्या आईने आणि इतर पालकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांचे भवितव्य अशा तांत्रिक कारणांमुळे धोक्यात घालणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच झालेल्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई कोण करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.