
सामान्यांची असामान्य शाळा असा लौकिक असलेल्या दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळाच्या ‘विद्या मंदिर’ शाळेने यंदाही दहावी परीक्षेच्या निकालात आपल्या उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवली. मंडळाच्या इंग्रजी माध्यमाचा निकाल यंदाही 100 टक्के लागला असून मराठी माध्यमाचा निकाल 98.67 टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे दोन्ही मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्या प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले.
इंग्रजी माध्यमाचा राजस एन. भांगे याने 99.20 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला तर हर्षदा पंकज पाटील हिने 97.20 टक्के गुण मिळवीत मराठी माध्यमाच्या शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. इंग्रजी माध्यमातून काव्य वैद्य याने 98.40 टक्के गुण मिळवत दुसरा तर स्वरा गांगण हिने 97.20 टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक पटकावला. चौथा आणि पाचवा क्रमांक अनुक्रमे निहार शिर्के (97 टक्के) आणि नियती परब (96 टक्के) मिळवला. मराठी माध्यमातून मयूरी शिंदे हिने (97 टक्के) दुसरा तर मधुरा चिंचकर (93.60 टक्के) हिने तिसरा क्रमांक पटकावला.