हार्ट अटॅकच्या सत्राने संपूर्ण जिल्हा हादरला! 40 दिवसांत 23 जणांनी गमावला जीव

गेल्या दोन वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे प्रमाढ वाढले आहे. कोरोना काळानंतर शाळकरी मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अनेकांनी हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावला. आता कर्नाटकातील हसनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. येथे गेल्या दीड महिन्यात तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बेंगळुरूमधील जयदेवा रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या 8 टक्के वाढली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महिन्याभरातच तब्बल 23 जणांचा मृत्यू झाल्यामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये सहा जण 19 ते 25 वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हसन आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून अनेक लोक रुग्णालयात शारिरीक तपासणीसाठी येत आहेत, अशी माहिती म्हैसूरच्या जयदेवा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

प्रेमाची तिरंगी लढत! प्रेयसिला त्रास दिला म्हणून बॉयफ्रेंडने तिच्या X ला चोपलं

कोरोना काळात घेतलेल्या लसींमुळे हृदविकाराचा धोका वाढलेला नाहीए. त्यामुळे लोकांनी लगेच बातम्या बघून घाबरून जाऊ नये, असे आवाहन म्हैसूरच्या जयदेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. एस. सदानंद यांनी केले आहे. लोकांनी फक्त जयदेवा रुग्णालयातच येण्याची गरज नाही. वेळप्रसंगी त्यांनी जवळच्या कोणत्याही रुग्णालयात त्यांच्या हृदयाची तपासणी करून घ्यावी. केवळ हृदय तपासणी करून भविष्यातील समस्या सोडवता येणार नाहीत. यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे, असे डॉ. के.एस. सदानंद यांनी सांगितले.