दोघा सख्या बहिणींची आत्महत्या

69

सामना प्रतिनिधी । नांदेड

दोन सख्या बहिणींनी शहरातील हस्सापूर येथील पुलावरुन उडी घेतल्याची घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. या दोघींचेही मृतदेह अडीच तासात जीवरक्षक दलाने शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले.

शहरातील राजनगर येथील गुणवंत भगत यांच्या दोन मुली सुप्रिया आणि सुचिता या दोन सख्या बहिणींनी आज दि.६ सप्टेंबर रोजी शहरातील हस्सापूर येथील पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली. दोन मुलींनी पुलावरुन उडी मारल्याची माहिती कळताच जीवरक्षक दलाच्या जवानांनी या दोन्ही मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता यापैकी सुप्रियाचा मृतदेह सुरुवातीला जीवरक्षक दलाने शोधून काढला. त्यानंतर अर्ध्या तासाने सुचिताचाही मृतदेह सापडला. या दोघींनी उडी घेतल्याचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या