
उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हाचाही लोकांना त्रास होऊ लागला आहे. ज्यांना दिवसा बाहेर भटकावे लागते, किंवा ते काही ना काही कामासाठी वारंवार बाहेर पडत राहतात. अशा परिस्थितीत, त्या लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की उष्णतेची लाट आणि उष्माघात तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात. उन्हात बाहेर पडताना आपण स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. घराबाहेर पडताना आणि घरी राहताना आपण नेहमीच महत्त्वाचे उपाय लक्षात ठेवले पाहिजेत.
देशात उष्णतेच्या लाटा आणि तीव्र सूर्यप्रकाशाचे परिणाम दिसून येत आहेत. दिवसा जोरदार उष्ण वारे वाहू लागले आहेत. देशभरातील अनेक शहरांमध्ये 38 ते 40 अंश तापमानामुळे लोकांचा जीव कासावीस झालेला आहे. अशा परिस्थितीत निष्काळजी राहिलो तर आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. कडक उन्हापासून संरक्षण नसल्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनची समस्या येऊ शकते. आपण डिहायड्रेशनच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर आपले जीवन देखील धोक्यात येऊ शकते.
उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय करा
शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. दिवसभर अधूनमधून पाणी पित राहा.
दिवसातून कमीत कमी तीन लिटर पाणी प्या. यामुळे पाण्याचे प्रमाण टिकून राहील.
भरपूर फळे खा. भरपूर लिंबूवर्गीय फळे देखील खा. यासोबतच फळांचा रसही प्या.
हिरव्या भाज्यांचे सेवन करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे शरीराला शक्ती मिळेल आणि आरोग्य टिकेल.
फळांचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया मजबूत राहते.
Summer Tips- उन्हाळ्यात घरी गुलाबजल का असायला हवं! वाचा सविस्तर
घरी राहून व्यायाम आणि योगा करा. तुमच्या शरीरातून घाम गाळा. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन देखील महत्त्वाचे आहे.
घराबाहेर पडताना टोपी, गमछा किंवा टॉवेल सोबत ठेवा. उन्हापासून तुमचे डोके वाचवण्यासाठी उपाययोजना नक्की करा.
घरी राहताना बाहेरची हवा आत येऊ देऊ नका. गडद रंगाचे पडदे वापरा. यामुळे खोली गरम होणार नाही.
खिडक्या बंद ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दारेही बंद ठेवा.
https://www.saamana.com/this-yoga-asana-should-be-done-in-summer-to-cool-the-body-and-calm-the-mind/
उन्हाळ्यात या गोष्टी करू नका
उन्हाळ्यात अधिक प्रमाणात चहा पिणे हे धोकादायक असते. त्यामुळे चहा शक्य असेल तितका टाळावा. अधिक चहा पिण्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.
सिगारेट आणि दारू पूर्णपणे बंद करा. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासेल.
उन्हातून आल्यानंतर घरात ठेवलेले फ्रीजमधील पाणी लगेच पिऊ नका. अर्ध्या तासानंतरच थंड पाणी प्या.
घरातील लहान मुले आणि वृद्धांना बाहेर पडू देऊ नका. सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते.
घरात ठेवलेल्या पाळीव प्राण्यांना सावलीच्या ठिकाणी बांधा आणि त्यांना वेळोवेळी पाणी द्या.
शाळा, ऑफिस किंवा कामावर जाताना, उघड्या उन्हात अजिबात जाऊ नका. छत्री, टॉवेल किंवा टोपी सोबत ठेवा.
तीव्र सूर्यप्रकाश डोळ्यांनाही हानी पोहोचवतो. अशा परिस्थितीत, सनग्लासेसशिवाय बाहेर पडू नका. चष्मा तुमच्या डोळ्यांचे रक्षण करतो.