
गाजर अलिकडे बारही महिने आपल्याला बाजारात दिसतात. गाजर हे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे मानले जाते. गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे अगणित आहेत. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात आपण हा रस पिल्याने शरीराला खूप फायदे मिळतात.
गाजराचा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो, ज्यामुळे यकृत निरोगी राहते.
गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप आवश्यक मानले जाते. यामुळे दृष्टी सुधारण्यास खूप मदत होते.
नवशिक्यांसाठी हिंदुस्थानातील सुरक्षित ट्रेक्स, निसर्गाच्या सोबतीने रोमांचक अनुभवांचे साक्षीदार व्हा
गाजराच्या रसात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत.
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसेच गाजराचा ज्यूस पिण्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचेला चमकही येते.
गाजराच्या रसात पोटॅशियमची मात्रा खूप असते. पोटॅशियम आपल्या हद्यासाठी खूप उत्तम मानले जाते. यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. तसेच हृदयविकाराचा धोकाही खूप कमी होतो.
वजन कमी करणाऱ्यांसाठी गाजराचा ज्यूस हा खूप महत्त्वाचा मानला जातो. गाजराच्या रसात कॅलरीज कमी असतात. यामुळेच वजन कमी करण्यास मदत होते.
गाजराचा ज्यूस कसा बनवावा?
साहित्य – गाजर 200 ग्रॅम, आवळा 1 नग, आलं 1 इंच (तुकडा), जेष्ठमध पावडर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार.
कृती – गाजर स्वच्छ धुऊन, सोलून त्यामधे आवळा, आलं, जेष्ठमध पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक करा. सर्व करतेवेळी चाळणीने न गाळता तसेच सर्व्ह करावे. त्यामुळे फायबर सुद्धा पोटात जातात. वाटल्यास चवीनुसार मीठ व साखर घालावी.


























































