
उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. उष्णतेमुळे त्वचेवर अनेकदा मुरमांची संख्या वाढू लागते अशावेळी कोणता उपाय करावा हे सूचत नाही. म्हणूनच खासकरून उन्हाळात फळांचा वापर हा त्वचेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. फळांपासून केलेले उपाय हे चेहऱ्यासाठी फार फायदेशीर ठरतात. खासकरून नैसर्गिक उपाय केवळ चेहऱ्यावर चमक आणत नाहीत तर त्वचेच्या समस्यांपासूनही आराम देतात. घरगुती उपचारांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्याचप्रमाणे, सफरचंद आणि कच्च्या दुधापासून एक फेसपॅक करणे अतिशय सोपे काम आहे.
काय उपाय करायला हवा?
सफरचंदांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करू शकतात. दुसरीकडे, कच्च्या दुधात लॅक्टिक अॅसिड आणि व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळते, यामुळे सुरकुत्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.
तळपायांना उन्हाळ्याच्या दिवसात का मसाज करायला हवा, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे
त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी सफरचंद आणि कच्च्या दुधाचा फेस पॅक फायदेशीर मानला जातो. त्यात अँटीऑक्सिडंट्ससोबतच आवश्यक जीवनसत्त्वे देखील आढळतात. कच्च्या दुधात एक्सफोलिएटिंग गुणधर्म आढळतात, जे त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
उन्हाळ्यात आपल्या त्वचेलाही हायड्रेशनची आवश्यकता असते. दूध आणि सफरचंद दोन्ही त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जातात, म्हणून हा फेस पॅक त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकतो. सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे त्वचेला दीर्घकाळ हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
तुमच्या त्वचेवर काळे डाग आणि पिगमेंटेशनची समस्या असेल तर हा फेस पॅक खूप प्रभावी ठरू शकतो. दूध आणि सफरचंदातील आवश्यक गुणधर्म त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यास मदत करू शकतात.
फेस पॅक कसा तयार करायचा?
सफरचंद – 4 तुकडे, कच्चे दूध – 2 चमचे, मध – 1 टीस्पून
कृती- सफरचंद आणि दुधाचा फेस पॅक बनवण्यासाठी फक्त कच्चे दूध वापरा. एका भांड्यात 4 सफरचंदाचे तुकडे ठेवा आणि मॅशरने मॅश करा. नंतर त्यात 1 चमचा मध घाला आणि चांगले मिसळा. शेवटी 2 चमचे दूध घालून पेस्ट तयार करा.


























































