
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणारप आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी बारामती मतदारसंघातून अजित पवार निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव केला होता.
28 जानेवारी रोजी अजित पवार बारामती येथे येत असताना त्यांचे विमान कोसळले. या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनाने बारामतीची जागा रिक्त झाली आहे. तर भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.



























































