पुन्हा सुनहरी यादें; 22 वर्षांनंतर गायिका प्रमिला दातार यांचा सुरेल नजराणा

 

पन्नास वर्षांपूर्वी मनोरंजन विश्वात ऑर्केस्ट्राची जबरदस्त क्रेझ होती. अनेक पुरुष मंडळींनी या व्यवसायाला आपलेसे केले होते. त्या वेळी गायिका प्रमिला दातार यांनी या क्षेत्रात स्वतःला आजमावले आणि सिद्ध करून दाखवले. प्रमिला दातार यांच्या ‘सुनहरी यादें’ या
ऑर्केस्ट्राने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात लोकप्रियता मिळवली होती. 2001पर्यंत या कार्यक्रमाचे तब्बल 4 हजार प्रयोग त्यांनी केले आणि हा ‘शो’ थांबला. या गोष्टीला आता 22 वर्षे झालेली आहेत. मागील दोन वर्षांत प्रमिला दातार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज आङ्गवणी व गाणी यांचा सिलसिला चालू ङ्खsवला. त्यांच्या चाहत्यांनी, कुटुंबातील सदस्यांनी केवळ आङ्गवण म्हणून पुन्हा रंगमंचावर ‘सुनहरी यादें’ ऑर्केस्ट्राचा एक शो करण्याचे सुचवले. या सगळय़ांच्या इच्छेनुसार प्रमिलाताई आता ‘सुनहरी यादें’चा 4001वा शो करण्यास सज्ज झाल्या आहेत. तेही वयाच्या 81व्या वर्षी. कन्या वंदना आणि शर्मिला यांच्या मदतीने त्यांनी हा शो आयोजित केलाय.

‘सुनहरी यादें’चा प्रयोग गुढीपाडव्याला म्हणजेच 22 मार्च रोजी रात्री शिवाजी मंदिर, दादर येथे रात्री 8.30 वाजता रंगणार आहे.