गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची अमेरीकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिच्या पृथ्वीवर येण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नासाने सुनिता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर दोघंही 2025 मध्ये पृथ्वीवर येणार असल्याचे जाहीर केले आहे. तोपर्यंत हे दोन्ही अंतराळवीर अंतराळयानाच्या स्पेस स्टेशनमध्येच राहतील. नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनीस्ट्रेशनने स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत करणे खूप धोकादायक आहे, ज्यामुळे बोईंगची स्टारलाइनर कॅप्सूल या दोन अंतराळवीरांशिवाय परत येईल.
मोहिमेचा एक भाग म्हणून विल्मोर आणि विल्यम्स औपचारिकपणे त्यांचे काम सुरू ठेवतील आणि 25 फेब्रुवारी 2025 रोजी ते पृथ्वीवर परत येतील. याचा अर्थ असा की जे चाचणी उड्डाण एका आठवड्यात होणार होते ते आता सुमारे 8 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. नासाने सांगितले की, सुनीता आणि विल्मोर एजेंसीच्या स्पेसएक्स क्रू-9 मिशनसाठी निवड केलेल्या दोन अन्य चालक दलाच्या सदस्यांसोबत ड्रॅगन अंतराळ यानातून परतणार आहेत. स्टारलायनरच्या अंतरिक्ष स्टेशनवरुन निघायला आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पृथ्वीवर प्रवेश आणि लॅण्डिंग करणार असल्याची आशा बाळगतो.
सुनीत विल्यम्स आणि बुच विल्मोर ज्यांनी जूनमध्ये नासाच्या बोईंग क्रू फ्लाइट टेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण केले होते, ही अंतराळ यात्रा 10 दिवसांचीच होती, मात्र यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दोन्ही अंतराळ यात्री गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळातच अडकले आहेत. दोघांना सुखरूप पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सुलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.