संदेसे आते है…! 27 वर्षांपूर्वींचे वचन पूर्ण करणार, बघा सनी देओलच्या ‘Border 2’ चा थरारक टिझर

सनी देओल याचा 1997 साली सुपरहिट ठरलेला चित्रपट बॉर्डर याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ब्लॉकबस्टरची घोषणा स्वत: सनी देओलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)


सनीने चित्रपटाचा टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये सनीचा व्हॉईसओव्हर ऐकू येत आहे. ज्यामध्ये 27 साल पहले एक फौजीने वादा किया था की वो वापस आएगा. उसी वादे को पूरा करने, हिंदुस्थान की मिट्टी को अपना सलाम कहने आ रहा है फिरसे… ( 27 वर्षांपूर्वी एका सैनिकाने वचन दिले होते की तो पुन्हा परतेल. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आणि हिंदुस्थानच्या मातीला सलाम करण्यासाठी तो परत येत आहे.) असे या व्हॉईसओव्हरमध्ये म्हटले आहे. या व्हिज्यूल्ससोबत मागे संदेशे आते हे पार्श्वसंगीत ऐकू येत आहे.

चित्रपटाचे शूटींग ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. बॉर्डर – 2 ची रिलीज डेट अद्याप समजली नसली तरी 2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 1997 च्या बॉर्डर नंतर बॉर्डर – 2 सुद्धा जे. पी. दत्ता चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि जे. पी. दत्ता यांची मुलगी निधी दत्ता देखील या चित्रपटाच्या सहनिर्मात्या असणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत.