मोदींना मागे टाकत सनी लिओनी बनली ‘मोस्ट सर्च सेलिब्रेटी’

719

पुन्हा एकदा सर्वांना मागे टाकत सनी लिओनी गुगलवर ‘मोस्ट सर्च सेलिब्रेटी’ बनली आहे. हिंदुस्थानात जानेवारीपासून सर्वाधिक शोधलेली व्यक्ती बनण्याचा मान सनी लिओनीला मिळाला. सनीने गुगल सर्चवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सलमान खान आणि शाहरुख खानलाही मागे टाकले आहे.

गुगल ट्रेंण्ड्स ऍनॉलिटिक्सनुसार सनी लिओनीशी संबंधित व्हिडीओ अधिक शोधले जातात. त्याचबरोबर तिची बायोपिक सिरीजही लोक शोधत असतात. सनीशी संबंधित सर्वाधिक सर्च हे मणिपूर आणि आसाम राज्यातून होत आहेत. सनीने याचे श्रेय आपल्या चाहत्यांना दिले असून गेल्यावर्षीही ती सर्वाधिक सर्च होणारी सेलिब्रेटी बनली होती.

आपली प्रतिक्रिया द्या