
तहलका मासिकाचा माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याला तीन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. बलात्कार प्रकरणी तेजपाल याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.






























































