
मुलगी शीना बोरा हिच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिने परदेशात जाण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तुमची परत येण्याची कुठल्याच प्रकारची गॅरंटी नाही असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. या प्रकरणातील खटला जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी यांना परदेशात जाण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.