
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने झटका दिला. 2020-21 मध्ये शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या पृषी कायद्यांविरुद्ध केलेल्या आंदोलनाशी संबंधित रिट्विटवरून कंगणा यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीची तक्रार दाखल झाली होती. ती तक्रार रद्द करण्याची मागणी करीत कंगणा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तथापि, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याचिकेत हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला. तुमचे कोणते साधारण रिट्विट नव्हती. तुम्ही त्यासोबत स्वतःची टिप्पणी जोडली आणि त्यात मसाला टाकला, अशा शब्दांत न्यायालयाने कंगना यांना फटकारले.