मनीष सिसोदीया यांच्या जामिनावर आज सुनावणी

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या जामीन याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के वी विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी होणार आहे. मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत.

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी  सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली होती. त्यानंतर ईडीने 9 मार्च 2023 रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांनी  दिल्ली उच्च न्यायालयाच्या 21 मे च्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.