पुण्यातील बालेवाडीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाला पार पडला. बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये हा कार्यक्रम झाला. आता या कार्यक्रमावर आणि सरकारच्या हेतूवरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सवाल उपस्थित केला आहे. तसेच मोठा गौप्यस्फोटही केला आहे.
लाईव्ह | जळगाव | पत्रकारांशी संवाद | 🗓️17-08-2024 https://t.co/H0W1gs177C
— Supriya Sule (@supriya_sule) August 17, 2024
जळगावमध्ये सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. महिलांसाठीच्या या योजनेचं आम्ही स्वागतच करू. पण या सगळ्या परिस्थिती माझ्याकडे एक मेसेज आला. सरकारमधले काही लोक महिलांना धमकी देत होते. याचा संदर्भातला चॅट आपल्याकडे आहे. हे काही काल्पनिक नाही. किंवा दबक्या आवाजात कोणी बोललंय, असंही नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहीला नाही तर, योजनेतून तुमचं नाव रद्द करण्यात येईल, अशा धमक्या सरकारमधील काही लोकांनी महिलांना दिल्या आहे. त्याचा संपूर्ण चॅट आपल्याकडे आहे, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला. हे अयोग्य आहे. सरकार ज्या पद्धतीने स्वतःचे कार्यक्रम मोठे करण्यासाठी जे काही करतंय ते अतिशय अयोग्य आहे. आणि इतकं असंवेदनशील सरकार असेल असं मला वाटलं नव्हतं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे.