
‘बिग बॉस मराठी 5’ व्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणचा नुकताच ‘झापुक झुपूक’ सिनेमा प्रदर्शित झाला, परंतु या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवत सूरज चव्हाणला गुलीगत धोका दिल्याचे दिसत आहे. ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर केदार शिंदे यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. सूरज चव्हाणचा महाराष्ट्रभर चाहता वर्ग आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ती आता फोन ठरल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 1 कोटी 24 लाखांची कमाई केली आहे, तर या चित्रपटाचे बजेट 5 कोटी रुपये इतके होते. या चित्रपटात सूरज चव्हाण व्यतिरिक्त जुई भागवत, मिलिंद गवळी यांच्या भूमिका आहेत.