जगभरात मंकीपॉक्सचे वाढते संक्रमण पाहता हिंदुस्थानने या आजारावर स्वदेशी आरटी- पीसीआर कीट बनवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 14 ऑगस्ट रोजी एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले. दोन वर्षांत या आजाराची आणीबाणी घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. या विषाणूचा नवीन स्ट्रेन (क्लॅड-1) पूर्वीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे आणि त्याचा मृत्यू दरही जास्त आहे. मंकीपॉक्स सार्वजनिक आणीबाणी घोषित केल्याच्या 15 दिवसांच्या आत, हिंदुस्थानने या आजाराचे निदान करणारे पहिले स्वदेशी आरटी- पीसीआर कीट विकसित केले आहे. या किटमधून मंकीपॉक्सची लागण झाली की नाही, हे अगदी 40 मिनिटांत समजले. कमी वेळेत मंकीपॉक्सचे निदान झाल्यामुळे त्याचा संसर्ग जास्त होणार नाही. सीमेन्स हेल्थिनीयर्सने ही कीट तयार केलंय. एमपॉक्सची चाचणी प्रक्रिया आणखी प्रभावी आणि कमी वेळेत होईल. मंकीपॉक्सवरील स्वदेशी आरसी- पीसीआर कीटचा वापर कधीपासून होणार असा प्रश्न सर्वांना पडलाय. परंतु, त्याची नेमकी तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. कीटचे नाव आयएमडीएक्स मंकीपॉक्स डिटेक्शन आरटी- पीसीआर ऍसे असे आहे.
वर्षाला10 लाख किट्स बनवण्याची क्षमता
सीमेन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडने म्हटले आहे की आरटी-पीसीआर किट वडोदरा येथील कंपनीच्या मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तयार केले जाईल. या युनिटची एका वर्षात 10 लाख किट्स बनवण्याची क्षमता आहे.