स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या! आम्ही आणतो अभिनंदनाचा प्रस्ताव!! शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रतिहल्ला

835

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न द्या ही आमचीही मागणी आहे. राज्य सरकारच्या वतीने माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दोन वेळा पाठवला आहे. केंद्रात अजूनही भाजपचेच सरकार असूनही भारतरत्न देण्यासाठी एवढा उशीर का, असा सवाल करीत सावरकरांच्या स्मृतिदिनी राजकीय स्वार्थ साधण्यापेक्षा आधी सावरकरांना भारतरत्न द्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तुमच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही आणतो असे सडेतोड उत्तर देत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून राजकारण करणाऱ्या भाजपचा डाव शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हाणून पाडला.

विधानसभेच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजातील प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी स्थगनचे सर्व प्रस्ताव फेटाळले. यावेळी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावर चर्चेची मागणी केली, मात्र ही स्थगनची सूचना होऊ शकत नसल्याचे सांगत अध्यक्षांनी मुनगंटीवार यांना प्रस्ताव वाचून दाखविण्यास सांगितले. मात्र या प्रस्तावात मुनगंटीवार यांनी, असे काही लोक आहेत की त्यांच्या देहावर दुसऱ्याच्या मेंदूचे नियंण आहे असे लोक सावरकरांविषयी अवमानजनक वक्तव्य करीत असल्याने हा प्रस्ताव आणण्यात आल्याचे सांगताच अध्यक्षांनी ही स्थगनची सूचना होऊ शकत नाही असे सांगत स्थगन प्रस्ताव मांडला. यालाच दुजोरा देत छगन भुजबळ यांनी नियमांचे पुस्तक वाचून दाखवत कोणतेही व्यक्रोक्तीपूर्ण, अपमानास्पद वक्तव्य करता येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

‘शिदोरी’वर बंदी घाला
काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमानजक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ‘शिदोरी’वर बंदी घाला अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडावा अशी मागणी केली. मुनगंटीवार यांनीही गौरव प्रस्तावावर चर्चा न घेता दोन ओळींचा ठराव मांडावा अशी मागणी केली.

‘शिदोरी’ मासिकातील सावकरांविषयीचा मजकूर फडणवीस यांच्याकडून वारंवार वाचून दाखवण्यात येत होता. याला जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. ‘शिदोरी’तील मजकूर वाचून दाखवत किरोधी पक्षनेते सावरकरांचा अवमान करीत आहेत. भारतरत्नसारखा सन्मान देण्याचा विचार करता आणि त्यांच्याविषयी सभागृहात वाईट वाचून दाखवता हे योग्य नाही. अशा गोष्टी करून भाजपकडून सावरकरांचा अवमान होत असल्याचे सांगून हे थांबविण्याची मागणी जयंत पाटील यांनी अध्यक्षांकडे केली.

…आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो
एकीकडे भाजप सदस्यांकडून गौरव प्रस्तावाचे राजकारण केले जात असताना याला संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी जोरदार आक्षेप घेतला. अध्यक्षांनी प्रस्तावाची तापसणी करून यावर निर्णय द्यावा. त्याचप्रमाणे प्रस्तावावर नितेश राणे यांचेही मत जाणून घ्यावे असे सांगतानाच शिवसेनेने सावरकरांना भारतरत्न द्यावे अशी मागणी केली आहे. तेव्हा आधी सावरकरांना भारतरत्न द्या, भारतरत्न दिल्यानंतर आम्ही तुमचे आणि मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो असा जोरदार टोला अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप सदस्यांना लगावला.
सत्तेत असताना सावरकरांना

भारतरत्न का दिले नाही? – अजित पवार
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सुरू असलेल्या राजकारणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, देकेंद्र फडणकीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कीर साकरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती, परंतु यामध्ये नेमकी काय अडचण आली याचे उत्तर मिळाले पाहिजे. कीर साकरकरांना भारतरत्न मिळाके अशी आमचीही मागणी आहे. राज्य सरकारकडून अपेक्षा करता मग तुम्ही सत्तेत असताना कीर साकरकरांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला.

हे भाजपचे मगरीचे अश्रू – सुनील प्रभू
आज महिला अत्याचाराचा विषय सभागृहापुढे असताना भाजप दुटप्पी राजकारण करीत आहे. मागील पाच वर्षे सरकार असताना भाजपने गौरवाचा ठराव का आणला नाही. त्यांचे सरकार असतानाही सावरकरांना भारतरत्न का देता आले नाही. सावरकरांविषयीचा त्यांना आलेला कळवळा म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची जोरदार टीका सुनील प्रभू यांनी केली.
सावरकरांच्या अवमानाचा भाजपचा प्रयत्न – जयंत पाटील

कामकाज बंद पाडण्याचा भाजपचा डाव उधळला
अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजप सदस्यांनी वेलमध्ये येत ‘सावरकर अमर रहे’ अशी घोषणाबाजी केली. ‘शिदोरी’ मासिकाची झेरॉक्स फाडत कागद हवेत भिरकावत पोस्टरबाजी केली. दरम्यान, आशीष शेलार यांनी भाजपाच्या सदस्यांना वेलमध्ये बसायला लावून प्रतिविधानसभाच सुरू केली. त्यापुढे मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांनी भाषणेही दिली. विरोधकांच्या गोंधळातच विधानसभ अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरू ठेवत सलग तिसऱ्या दिवशी कामकाज बंद पाडण्याचा भाजपाचा डाव उधळला. या गोंधळात पाच विधेयके मंजूर करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या