स्विगीचे सह-संस्थापक लक्ष्मी रेड्डी यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्विगीचे सह-संस्थापक लक्ष्मी नंदन रेड्डी ओबुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्विगीने नियामक फाइलिंगमध्ये याची माहिती दिली. ओबुल कंपनीत पूर्णवेळ संचालक आणि हेड ऑफ इनोव्हेशनची जबाबदारी सांभाळत होते. ओबुल यांच्या जाण्यासोबतच स्विगीच्या बोर्डात अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या आणि नियमांमधील बदलांनाही मंजुरी देण्यात आली आहे. स्विगीच्या बोर्डाने रेनन डी कास्त्राs अल्वेस पिंटो यांची नॉमिनी डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. स्विगीचे सह-संस्थापक आणि मुख्य ग्रोथ ऑफिसर फणी किशन अडेपल्ली आणि ग्रुप सीएफओ राहुल बोथरा यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.