झोमॅटोनंतर आता स्विगीचाही झटका, ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरसाठी मोजावे लागणार 17.58 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने ऑर्डरवरील प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये 19 टक्के वाढ केल्यानंतर आता स्विगीनेही आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. स्विगीने आपली प्लॅटफॉर्म फी 14.99 रुपयांऐवजी आता 17.58 रुपये केली आहे. याचाच अर्थ कंपनीने 2.50 रुपये प्रति ऑर्डर वाढवले आहे. स्विगीवरून जेवण ऑर्डर करण्यासाठी आता ग्राहकाला प्रति ऑर्डर 17.58 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.

स्विगीने आपल्या प्लॅटफॉर्म फी वाढवून आता 17.59 जीएसटीसह केली आहे. याआधी ही फी 14.99 रुपये होती. गेल्या आठवडय़ात झोमॅटोने फी वाढवल्यानंतर स्विगीने ही फी वाढवली आहे. झोमॅटो आणि स्विगीवरून जर एखाद्या ग्राहकांना 200 रुपयांचे किंवा 2 हजार रुपयांचे जेवण ऑर्डर केले तर त्याला ही प्लॅटफॉर्म फी द्यावीच लागणार आहे. प्लॅटफॉर्म फी वाढीमागे कंपन्यांनी ऍप मेंटेनन्स, टेक्नोलॉजी सुधारणा आणि अन्य काही कारणे सांगितली आहेत. प्लॅटफॉर्म फी ही प्रत्येक फूड ऑर्डरवर लागू होणारे अतिरिक्त शुल्क आहे.