
आगामी टी20 मुंबई लीग 2025 मध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या मुंबई दक्षिण-मध्य मराठा रॉयल्स संघाने शनिवारी वाशी येथे एका कार्यक्रमात संघाची जर्सी आणि अधिकृत अँथमचे अनावरण केले. या कार्यक्रमात खेळाडू आणि संघमालक एकत्र आले होते. या सोहळ्यात टी20 मुंबई प्रीमियर लीगचे सीईओ अजिंक्य जोशी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष कमलेश पिसाळ, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, आणि अमित काळे, एमसीएच्या एपेक्स कमिटीचे सदस्य सुशील शेवाळे, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि मामी पोको पँट्सचे कंट्री हेड अनिरुद्ध सिंग चौहान हे उपस्थित होते.
मराठा रॉयल्स 4 जून रोजी प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर आकाश टायगर्सविरुद्धच्या त्यांच्या अधिकृत मोहिमेपूर्वी रायगड रॉयल्सविरुद्ध सराव सामना खेळेल. या संघाचे नेतृत्व मुंबईचा अनुभवी खेळाडू सिद्धेश लाड करणार आहे. अभिषेक नायर मार्गदर्शक आणि मुख्य प्रशिक्षक अमित दानी हे असणार आहेत.





























































