T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा विजय; पाकिस्तानला 6 धावांनी धूळ चारली

पारंपारीक प्रतिस्पर्धी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभाव केला. गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दिलेले 120 धावांचे माफक लक्ष पूर्ण करण्यात पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेला अचूक मारा आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळाल्यामुळे टीम इंडियाचा 6 धावांनी विजय झाला.