T20 World Cup 2026 – अखेर शेवटच्या संघाने आपली जागा पक्की केली, आता 12 देशांमध्ये द्वंद्वं रंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ICC T20 World Cup 2026 चे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. 7 फेब्रुवारीपासून वर्ल्डकप विजेतेपदासाठी संघ आपआपासत भिडणार आहेत. एकीकडे पुरुषांच्या वर्ल्डकपची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर दुसरीकडे महिलांच्या टी-20 वर्ल्डकपची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकप पात्रता फेरीत स्कॉटलँडने अमेरिकेला धुळ चारत दुसऱ्यांदा वर्ल्डकपचं तिकीट मिळवलं आहे.

सुपर सिक्सच्या पात्रता फेरीतील अंतिम सामन्यात स्कॉटलँड आणि अमेरिका या संघांमध्ये भिडत झाली. स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 178 धावा केल्या आणि अमेरिकेला जिंकण्यासाठी 179 धावांचे आव्हान दिले. स्कॉटलँडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेची गाडी रडत रडत 137 धावांपर्यंत पोहोचली आणि 19 व्या षटकांत संपूर्ण संघ बाद झाला. स्कॉटलँडने 41 धावांनी सामना जिंकला आणि अगदी थाटात वर्ल्डकपचं तिकीट मिळवलं. सुपर सिक्सच्या पात्रता फेरीत स्कॉटलँडपूर्वी बांगलादेश, आयर्लंड, नेदरलँड या संघांनी वर्ल्डकपसाठी आपली जागा पक्की केली होती. आता स्कॉटलँड वर्ल्डकपमध्ये आपली जागा पक्का करणारा चौथा संघ ठरला आहे. स्कॉटलँडच्या विजयासह पात्रता फेरीचा रणसंग्रमाम आता संपुष्टात आला आहे.

सुपर सिक्सच्या पात्रता फेरीतून टी20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेल्या चार संघांसह आता 12 संघांची यादी पूर्ण झाली आहे. 12 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये या चार संघांव्यतिरिक्त हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या देशांचा समावेश आहे.