पालकांना लुबाडणाऱ्या शाळा-कॉलेजवर फौजदारी कारवाई करा

23

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्य सरकारने ऑक्टोबर 2018 मध्ये अकरावी-बारावीची फी जाहीर केली असून सरकारने ठरवलेल्या फीपेक्षा जास्त रक्कम आकारून पालकांना लुबाडणाऱ्या शाळा-कॉलेजवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ‘सिस्कॉम’ संघटनेने केली आहे.

मुंबई विभागासाठी अकरावी-बारावीची आर्टस् आणि कॉमर्सची मुलांसठी फी अनुक्रमे 340 आणि 740 इतकी तर सायन्स शाखेची फी 480 आणि 880 इतकी आहे. आर्टस् आणि कॉमर्स करणाऱ्या मुलींकडून अनुक्रमे 100 आणि 500 रुपये तर सायन्स करणाऱ्या मुलींकडून 240 आणि 640 रुपये आकारले जातात. सरकारने ठरविलेल्या या फीपेक्षा जादा पैसे आकारणाऱ्या शाळा- कॉलेजने विद्यार्थ्यांना 15 दिवसांच्या आत पैसे परत करावे असे आदेश सरकारने काढावेत, अशी मागणी ‘सिस्कॉम’च्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना परत केलेल्या फीविषयीचा अहवाल संस्थाचालकांनी सरकारला सादर करावा व हा अहवाल सरकारने सर्वसामान्यांसाठी जाहीर करावा, अशी मागणीही ‘सिस्कॉम’ने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या