
तामीळ सुपरस्टार विजय यांनी तामीळनाडूत 2026 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नसून, स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच भाजपाच आपला एकमेव वैचारिक शत्रू असून डीएमके राजकारणातील शत्रू असल्याचेही सांगतानाच, भाजप हा फॅसिस्ट आणि डीएमके विषारी असल्याची टीकाही त्यांनी केली. मदुरै येथे झालेल्या तमिळगा वेट्री कळघमच्या दुसऱया राज्यस्तरीय बैठकीत विजय यांनी आपला निर्णय जाहीर केला.