आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचे मोफत ऑनलाईन क्रिटीकल केअर ट्रेनिंग देणार, टाटा ट्रस्टची घोषणा

582

आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचे क्रिटीकल केअर प्रशिक्षण देण्याचा निर्णय टाटा ट्रस्टने दिला आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेज (सीएमसी), वेल्‍लोर आणि केअर इन्स्टिट्यूट ऑफ हेल्‍थ सायन्‍सेस (सीआयएचएस), हैद्राबाद यांचे सहाय्य घेतले जाणार आहे.ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी म्हटले की ”जगापुढे सध्‍या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्याचे आव्हान आहे. या परिस्थितीत करावा लागत असलेले सर्वात कठीण आव्‍हान आपत्‍कालीन संसाधनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.”

हा कोर्स 22 तासांचा असून लॅपटॉप्‍स, डेस्‍कटॉप्‍स किंवा मोबाइल फोन्‍सद्वारे या कोर्सद्वारे शिक्षण घेता येऊ शकेल. आयसीयूमधल्या महत्वाच्या गोष्टी, एअरवे व्‍यवस्‍थापन व व्‍हेंटिलेटर व्‍यवस्‍थापन याबाबत कोर्समध्ये शिकवले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या