सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार कर भरणा कार्यालये, कल्याण, डोंबिवलीत 10 ठिकाणी सोय

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि 27 गाव परिसरातील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा आता सुलभ होणार आहे. केडीएमसी प्रशासनाने आठवड्यातील सातही दिवस कर भरणा कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दहा प्रभाग क्षेत्रात विशेष कक्ष सुरू केले आहेत. ही कार्यालये दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहेत.

महापालिका हद्दीतील विविध भागांमध्ये विशेष नवीन मालमत्ता कर व पाणी देयक भरणा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन रांगा लावण्याची गरज भासणार नाही. हे केंद्र प्रभाग पातळीवरील दहा नागरी सुविधा केंद्रांव्यतिरिक्त सुरू करण्यात आली आहेत. अधिकाधिक कर व पाणीपट्टीची वेळेत वसुली करण्याचा उद्देश यामागे असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिली. ज्या नागरिकांना मालमत्ता कर किंवा पाणी देयकाची बिले मिळालेली नाहीत त्यांनाही या केंद्रांवर ऑनलाइन प्रणालीद्वारे देयक तपासून भरणा करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी आहेत नवीन केंद्रे
‘अ’ प्रभाग क्षेत्र मोहने पूर्व यादवनगर, शांताराम प्राईड सोसायटी अटाळी कोळीवाडा,
‘ब’ प्रभाग क्षेत्र कल्याण पश्चिम उंबर्डे, मोहन रिजन्सी, बारावे,
‘क’ प्रभाग क्षेत्र – कल्याण पत्रीपुलाजवळ सर्वोदय पार्क,
‘जे’ प्रभाग क्षेत्र – नेतिवली, मेट्रो मॉल रेसिडेन्सी लोकग्राम,
‘ड’ प्रभाग क्षेत्र खडेगोळवली विठ्ठल रुक्मिणी मंदिर, काटेमानिवली,
‘फ’ प्रभाग क्षेत्र – डोंबिवली पूर्व ठाकुर्ली 90 फुटी रस्ता बालाजी आंगण सोसायटी, आगरकर रस्ता रघुनाथ जानकी सोसायटी,
‘ह’ प्रभाग क्षेत्र – डोंबिवली पश्चिम घनश्याम गुप्ते रस्त्यावर शिधावाटप दुकानासमोर,
‘ग’ प्रभाग क्षेत्र डोंबिवली पूर्व झायका हॉटेलजवळ, पॅसिफिक औरा इमारत,
‘आय’ प्रभाग क्षेत्र कल्याण पूर्व क्लब हाऊस, अनमोल गार्डन कॉम्प्लेक्स,
‘ई’ प्रभाग क्षेत्र डोंबिवली-कल्याण रेल्वे रस्ता कासा रिओ, पलावा सिटी क्लब हाऊस. असल्याची माहिती पोलिसांनी दिली