
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस)मध्ये कर्मचारी कपात झाल्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच एक मोठे गिफ्ट दिले आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना क्वॉर्टरली व्हेरिएबल अलाउन्स (क्यूव्हीए) ची घोषणा केली आहे. तसेच ज्युनिअर कर्मचाऱ्यांना 100 टक्के टीव्हीपी देणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीतील मिड आणि सीनिअर लेवलच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक टीव्हीपी देणार असल्याचे म्हटले आहे. हा टीव्हीपी कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारावर तयार केला जाईल. सी3ए ग्रेड आणि त्यांच्या खालील कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक पगारवाढ 25 सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे, अशी माहिती टीसीएसचे मुख्य एचआर सुदीप कुन्नुमल यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे दिली आहे. चांगला परफॉर्म करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डबल डिजिट पगारवाढ मिळेल, असेही या ई-मेलमध्ये म्हटले आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या सप्टेंबर तिमाहीत टीसीएसचा निव्वळ नफा 3.8 टक्के घसरणीसह 12,075 कोटी आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत 12,760 कोटी रुपये होता.