धक्कादायक! शाळेतील वर्गशिक्षिकाच आठवीच्या मुलासोबत घरातून पळाली

1354

हायस्कूलमधील मुलांना शिकविणारी 26 वर्षीय शिक्षिका अवघ्या 14 वर्षीय आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत पळाल्याचा प्रकार गुजरातमधील गांधीनगर येथे उघडकीस आला आहे. त्या किशोरवयीन विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे अनैतिक संबंध होते अशी माहिती आता समोर येत आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी गांधीनगर जिल्ह्यातील कालोल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मुलाचे वडील गांधीनगर उद्योग भवनात सरकारी नोकरीत असून त्यांनी शिक्षिकेवर फूस लावून मुलाला पळविल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षिका आणि मुलामध्ये वर्षभरापासून घनिष्ट संबंध निर्माण झाले होते. या गोष्टी शाळा प्रशासनाच्या लक्षात आल्याने दोघांना समज देण्यात आली होती. हा मुलगा आठव्या इयत्तेत आहे. त्यांचे नाते कोणीही मान्य करणार नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे शुक्रवारी दोघेही घर सोडून निघून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली. पालकांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरोधात कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक के. के. देसाई यांनी दिली. दरम्यान, शिक्षिका आणि मुलाकडे फोन नसल्याने सध्या हे दोघे कोठे आहेत ते शोधणे कठीण जात असल्याचे देसाई यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या