
नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हार्बरची रेल्वे विस्कळी झाली आहे. गेली अर्धा ते पाऊण तास अप आणि डाऊन मार्गावर ट्रेन जागच्या जागीच उभ्या होत्या. आता ही बिघाड दुरुस्त झाला असून लोकल सुरू झाल्या आहेत.
काल मुंब्र्याजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही लोकलचे रडगाणे संपताना दिसत नाहियेत. काल संध्याकाळच्या सुमारास ठाण्याहून हार्बर मार्गावर धावणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. तेव्हा ठाणे स्थानकावर मोठी गर्दी पहायला मिळाली होती. आता ऐनवेळी ऑफिसला जाण्याच्या वेळी हार्बर मार्गावर लोकलचा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे लोकल 30-45 मिनिटं उशिरा धावत आहेत.