पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गोरेगांवजवळ तांत्रिक बिघाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगांव स्थानकाजवळ लोकल गाड्या खोळंबून उभ्या राहिल्या आहेत. लोकल ट्रेनच्या मोटरमनने पॅनलमध्ये बिघाड झाल्याची सूचना लोकलमधील प्रवाशांना दिली आहे. गोरेगांव स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

एका प्रवाशाने लोकल गाड्या केव्हा सुरू होतील याबाबत काहीच माहिती दिली जात नसल्याबद्दल रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना टँग करत तक्रार केली आहे.

या मार्गावरील गाड्या 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. मोटरमनने केलेल्या उद्घोषणेमध्ये गोरेगांव स्थानकाजवळ सिग्नल पॅनेलमध्ये बिघाड झाल्याने हा खोळंबा झाल्याचे सांगितले आहे.

Photo – एक्झिट पोलच्या अंदाजानंतर एनडीएची वज्रमुठ

 

या बिघाडामुळे कार्यालयात, क्लासला जाणाऱ्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. एका प्रवाशाने सामनाच्या प्रतिनिधीला फोन करून तो मालाड आणि गोरेगांवमध्ये गेली ३० मिनिटे अडकला असल्याचे सांगितले. गोरेगांव स्थानकाजवळ लोकल ट्रेन एकामागोमाग एक उभ्या असल्याचं सांगितलं.

पश्चिम रेल्वेच्या सब वेमध्ये सरकता जिना