
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली मतदार हक्क यात्रेचा समारोप बिहारमधील पाटण्यातील गांधी मैदानात झाला. या समारोपाच्या कार्यक्रमात राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाजपा गंभीर आरोप केले. भाजप देशात राजेशाही आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी बोलताना बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, “बिहार ही लोकशाहीची जननी आहे. परंतु, भाजपाचे दोन नेते निवडणूक आयोगाशी संगनमत करून या लोकशाहीच्या पवित्र भूमीतून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला, “तुम्हाला लोकशाही हवी आहे की राजेशाही?”
तेजस्वी यांनी भाजपावर जोरदार टीका करताना म्हटले, “हे लोक बिहारी जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारखाने गुजरातमध्ये उभारायचे आणि मते बिहारमधून मागायची. आपली मते कापू देऊ नका.”
तेजस्वी यादव यांनी बिहारमधील नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजन सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “या सरकारचे एक इंजन गुन्हेगारीचे आहे, तर दुसरे भ्रष्टाचाराचे. मुख्यमंत्री नीतीश कुमार हे भ्रष्टाचाराचे भीष्म पितामह बनले आहेत. मंत्र्यांच्या घरी सकाळ-संध्याकाळ भेटी होतात. त्यांच्या विभागातील अभियंते पकडले जातात, तेव्हा कोट्यवधी रुपये जाळले जातात. असे प्रकार सर्रास सुरू आहेत.”
बिहार की धरती लोकतंत्र की जननी है।
BJP के लोग चुनाव आयोग के साथ मिलकर लोकतंत्र और संविधान को ख़त्म करना चाहते हैं।
नरेंद्र मोदी फैक्ट्री गुजरात में लगाएंगे और विक्ट्री बिहार में चाहते हैं। ये ऐसा करके बिहार को ठगना चाहते हैं, लेकिन ये संभव नहीं है।
बिहार की जनता ऐसे ठग लोगों… pic.twitter.com/mMOir88igu
— Congress (@INCIndia) September 1, 2025