
काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी आज तहकूब करण्यात आली. त्यावर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नीकडे 3 देशांचे पासपोर्ट असून अमेरिकेतील एका कंपनीत हिमंता सरमा यांनी 52 हजार कोटी रुपये गुंतविल्याचा गौप्यस्फोट खेरा यांना केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी आसाम पोलिसांनी खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापे मारले होते. या घडामोडींनंतर खेरा यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी खेरा यांच्या वतीने व्हर्च्युअली युक्तिवाद केला. सरमा यांच्या सरकारने बदल्याच्या भावनेतून खेरा यांच्या विरोधात आसाममध्ये गुन्हे दाखल केल्याचा दावा सिंघवी यांनी केला.























































