मुस्लिम महिलेला तलाकचा पूर्ण अधिकार, उच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल

मुस्लिम महिलेला तलाक देण्याचा पूर्ण आणि बिनशर्त हक्क आहे. तिला ‘खुला’द्वारे घटस्पह्ट घेण्यासाठी पतीच्या संमतीची गरज नाही, असा ऐतिहासिक निकाल तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे. मुस्लिम कायद्यानुसार पत्नी ‘खुला’द्वारे एकतर्फी तिचे लग्न मोडू शकते. तिला पतीच्या संमतीबरोबरच मौलवी वा दार-उल-कझाकडून ’खुलानामा’ जारी करण्याचीही आवश्यकता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती बी.आर. मधुसूदन राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ‘खुला’ हा मुस्लिम समाजात पत्नीच्या पुढाकाराने घेतला जाणारा घटस्पह्ट आहे.