
जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पंठस्नान घालण्यात आले. या दहशतवाद्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. आठवडाभरात घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न लष्कराने उधळून लावला आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि कश्मीर पोलिसांकडून घुसखोरीच्या प्रयत्नाबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार 14 आणि 15 मार्चच्या रात्री लष्कराकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. उरी सेक्टरमधील बुच्छर भागात दहशतवाद्याने जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.




























































