जम्मू कश्मीरमध्ये वाढले दहशतवादी हल्ले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावली तातडीची बैठक

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सुरक्षा सचिव गिरीधर अरमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सैन्य प्रमुख उपेंद्र द्विवेदी, लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्यासह सुरक्षा विभागाच्या प्रमुखांना बोलावण्यात आले आहे.

दुसरीकडे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर जम्मू कश्मीरच्या सुरक्षा दल हाय अलर्टवर ठेवण्यात आला आहे. 10 ऑगस्टला अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशदवाद्यांच्यां दोन जवान शहीद झाले होते तर एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला होता.

अनंतनागमध्ये सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू कश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई केली होती. यात हवलदार दीपक कुमार यादव आणि लान्स नायक प्रवीण शर्मा हे शहीद झाले.

केंद्रीय गृहमंत्रालयलाने दिलेल्या माहितीनुसार 21 जुलैपर्यंत जम्मू कश्मीरमध्ये 24 चकमकी उडाल्या त्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्य़ांचाही समावेश होता.