
इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे मुंबईतील पहिले शोरूमचे उद्घाटन 15 जुलैला होणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 4,000 चौरस फूट रिटेल जागेसाठी भाडेपट्टी करार केला आहे. टेस्लाचे हे हिंदुस्थानातील पहिले शोरूम आहे. शांघाय कारखान्यातून पाच मॉडेल वाय कार आधीच मुंबईत पोहोचल्या आहेत. या वाहनांची किंमत 27.7 लाख आहे आणि त्यावर 21 लाखांपेक्षा जास्त आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या कारची किंमत 48 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.