रविवारी ठाणे अर्ध मॅरेथॉन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या लांब पल्ल्याच्या शर्यतीच्या विश्वात मानाचं स्थान मिळवलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया ठाणे अर्ध मॅरेथॉनची 12वी स्पर्धा 8 फेब्रुवारीला हिरानंदानी इस्टेट, ठाणे येथे रंगणार आहे. स्ट्राइडर्स आयोजित या प्रतिष्ठत स्पर्धेत 21 किमी, 10 किमी आणि 4 किमी (फन रन) अशा गटांचा समावेश असून फिटनेस, शिस्त आणि समाजभावनेचा जागर केला जाणार आहे.

जवळपास दोन दशकांपासून हिंदुस्थानातील धावसंस्कृतीला दिशा देणाऱया स्ट्रायडर्ससाठी हे आयोजन आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. 2026च्या सत्रात युनियन बँक मुख्य पुरस्कर्ते म्हणून लाभले असून आरोग्य, वेलनेस आणि समाज यांची बांधिलकी अधोरेखित केली आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण जे ब्रँड अँबेसेडर म्हणून हजारो धावपटूंना प्रेरणा देतील. मागील वर्षी 15 हजारांहून अधिक धावपटूंच्या सहभागाने गाजलेल्या या स्पर्धेत यंदा नवोदितांपासून अव्वल अॅथलीट्सपर्यंत सर्वांचा जोश पाहायला मिळणार आहे.

Thane half marathon 2026: union bank and striders to host 12th edition with milind soman

the 12th union bank of india thane half marathon organized by striders will be held on february 8 at hiranandani estate. fitness icon milind soman to inspire thousands of runners.