लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; डोके फोडले

लोकलमधील सीटवर बसण्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने हातातील कड्याने दुसऱ्या प्रवाशाचे डोके फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. यात रवींद्र चौहाण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गणेश लाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाळा येथून कामावरून सुटून रवींद्र चौहाण हे टिटवाळा येथे घरी निघाले होते. कुर्त्यावरून त्यांनी आसनगाव लोकल पकडली. ती लोकल ठाणे रेल्वे स्थानकात आल्यावर उभ्या असलेल्या चौहान यांनी बसलेल्या काही प्रवाशांना आता उठून उभे राहा, आम्हाला बसू द्या असे सांगितले. याचदरम्यान गणेश लाड याने उटत नाही असे बोलून वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की गणेश याने शिवीगाळ करून हातातील कड्याने मारहाण केली.