
अलिबागमधील प्रसिद्ध मयूर बेकरीच्या मालक, पर्यावरणस्नेही उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या पाटील यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी आणि जावई असा परिवार आहे.
अलिबागमध्ये विद्या पाटील यांनी मयूर बेकरी या नावाने बेकरीची स्थापना केली. त्या काळात प्लास्टिकचा वाढता वापर ही मोठी समस्या होती, पण विद्या पाटील यांनी सुरुवातीपासूनच प्लास्टिकला पर्याय म्हणून कागद, कपडा आणि नैसर्गिक पॅकिंगचा वापर केला. त्यामुळे मयूर बेकरी हा व्यवसायच नव्हे तर समाजातील पर्यावरण जनजागृतीचा पेंद्रबिंदू बनला. पर्यावरण संवर्धनासह विद्या पाटील यांचा सामाजिक क्षेत्रातही मोठा सहभाग होता. स्थानिक महिला गट, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून त्यांनी वृक्षारोपण, प्लास्टिकविरहित उपक्रम, हरित जनजागृती असे अनेक उपक्रम राबवले.


























































