
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झोतामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. यंदाच्या मोसमातील अत्यंत निचांक तापमानाची नोंद आज झाली असून बदलापूर आणि कर्जतचा पारा 9 अंश सेल्सिअसवर घसरला तर कल्याणमध्ये 11 आणि डोंबिवलीत 12 अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदवले गेले.
यंदा एकाच वर्षात दोनदा निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात बदलापूरचा पारा 10.7 अंश सेल्सिअस इतका उतरला होता. तो आज 9.3 इतका नोंदवला गेला. जानेवारी महिन्यात कल्याण-डोंबिवलीचे तापमान 12 अंशापर्यंत खाली आले होते. आज यंदाच्या वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झाली असून कल्याणमध्ये 11.8 तर डोंबिवलीत 12.3 इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.
बदलापूरपाठोपाठ रायगड जिल्ह्यातही पारा घसरला आहे. कर्जतमध्ये 9.7 इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. अंबरनाथ आणि पारघरमध्येही पारा 10 अंशांवर उतरला.
बदलापूर 9.03
कर्जत 9.07
अंबरनाथ 10.5
पालघर 10.8
कल्याण 11.8
पनवेल 11.9
डोंबिवली 12.3
विरार 12.7
नवी मुंबई 13.5