ठाणे जिल्हा परिषदेलाच उच्च न्यायालयाकडून 25 हजारांचा दंड

ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या परिपत्रकानुसार एका वेतनवाढीचे फायदे ठाणे जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेळेत न दिल्यामुळे दाखल अवमान याचिकेत ठाणे जिल्हा परिषदेला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती एम. एम. साठे यांनी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अ‍ॅड. शिवकुमार मठपती यांनी अवमान याचिका दाखल केली होती. ठाणे जिल्हा परिषदेतील चिंतामण वेखंडे व इतर 37 जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. आदेशाचे पालन न झाल्यामुळे अवमान याचिका दाखल केली होती. दंडाची रक्कम न्याय व विधी प्राधिकरण मुंबई येथे जमा करण्याचे आदेश पारीत केले.