
पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण हे व्याज कधी जमा होईल आणि जमा रक्कमेवर किती व्याज जमा होईल याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र याबाबतची कोणतीही तारीख सरकारने किंवा पेंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जाहीर केलेली नाही. मात्र याची प्रक्रिया लवकरच सुरू होई. प्रक्रियेसाठी साधारणतः तीन महिने लागू शकतात.
ईपीएफ व्याज हस्तांतरणासाठी सरकारने कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. पण खात्यात ही रक्कम येण्यापूर्वी पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
l ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज वर्षभरासाठी ईपीएफ व्याजदर निश्चित करते. l सीबीटीचा निर्णय केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येतो. l केंद्र सरकार या निर्णयावर अंतिम फैसला घेते. त्यानंतर व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा होईल. l पहिला टप्पा पूर्ण झाला असून अंतिम मंजुरीसाठी 3 महिने लागू शकतात.



























































