कुकर चिकट – तेलकट झाला… हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुकरवर तेल, मसाल्यांचे अनेक काळे-चिकट डाग लागतात. जे वेळीच साफ केले नाही तर अधिक घट्ट होऊन बसतात. ते घालवण्यासाठी कुकरमध्ये पाणी टापून उकळवा. उकळत्या पाण्यात चमचाभर डिटर्जंट पावडर आणि एक चमचा मीठ टाका.

कुकरवर फार जास्त चिकटपणा असेल तर त्यात अर्ध्या लिंबाचा रसही टापू शकता. कुकर थंड झाल्यावर काथ्याने चांगला घासा. दुसरा उपाय म्हणजे कुकरमध्ये पाणी आणि व्हाइट व्हिनेगरचं मिश्रण उकळवा. आता गॅस बंद करून या मिश्रणात बेकिंग सोडा घाला.