
जगप्रसिद्ध चार धाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. आता उद्या 4 मे रोजी सकाळी 6 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत. बद्रीनाथ धामचे दर्शन करण्यासाठी आधीच नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी केलेली असेल तरच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट registrationandtouristcare.uk.gov.in वर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. चारधाम यात्रा सहा महिन्यांपर्यंत चालणार आहे.